२० हजार रुपये मिळणार, पुढील ३ वर्षांसाठीही तरतूद म. टा. विशेष प्रतिनिधी, करोना कालावधीत अव्याहत केलेल्या कामाची पावती म्हणून मुंबई पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना शुक्रवारी २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा येथील निवासस्थानी शुक्रवारी महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोनसचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालिकेवर सुमारे २५० कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई पालिकेच्या ९५ हजार कर्मचाऱ्यांसह बेस्टच्या ३२ हजार कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी दणक्यात होणार आहे. गेल्या वर्षी करोना प्रादुर्भावापासून पालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावले. यंदा जाहीर झालेल्या बोनसची रक्कम पुढील तीन वर्षे मिळेल, असेही जाहीर करण्यात आले आहे. पालिका कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी १५,५०० रुपये आणि बेस्टच्या कामगारांना १०,१०० रुपये बोनस मिळाला होता. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लाभ पालिकेचे प्राथमिक, माध्यमिक, अनुदानित शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, अधिव्याख्याते, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये, प्राथमिक शिक्षण सेवकांना ५,६०० रुपये, आरोग्य सेविकांना ५,३०० रुपये इतका बोनस दिला जाणार आहे. तसेच, विनाअनुदानित माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवकांना २,८०० रुपये इतका बोनस जाहीर केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3EsrfuB
No comments:
Post a Comment