म. टा. प्रतिनिधी, यांच्यावर खंडणीचा आरोप केलेले यांचा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) शोध सुरू आहे. जबाब नोंदीसाठी सैल सापडत नसल्याने एनसीबीने अखेर मुंबई पोलिस आयुक्तांन पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सैल यांनी, वानखेडेंनी अन्य साक्षीदार किरण गोसावी यांच्यामार्फत खंडणी मागितल्याचा आरोप करणारे शपथपत्र सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. या आरोपानंतर एनसीबीने उत्तर क्षेत्राचे उप महासंचालक ग्यानेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात विशेष दक्षता पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पथकाने बुधवारी वानखेडे यांची चार तास चौकशी केली. पण प्रभाकर सैल यांचा जबाब 'एनसीबी'ला नोंदविता आलेला नाही. प्रभाकर सैल यांनी चौकशीसाठी समोर यावे व प्रकरणाची सर्व माहिती द्यावी, असे आवाहन ग्यानेंद्र सिंह यांनी केले आहे. सैल यांची चौकशी करून त्यांचा जबाब घेण्यासाठी एनसीबी मुंबई कार्यालयाने त्यांना दोन दिवसांपूर्वीच विशेष पथकाच्या सूचनेवरून सैल यांना चौकशीसाठी बोलवले. पण, ते चौकशीसाठी एनसीबी मुंबई कार्यालयात किंवा या विशेष पथकासमोर आलेले नाहीत. एनसीबीने त्यांचा राहत्या पत्त्यावरही शोध घेतला. पण तेथेही सैल सापडले नाहीत. त्यामुळे अखेर एनसीबीने मुंबई पोलिसांना यासंबंधी विनंती केली आहे. सैल यांना चौकशीसाठी हजर करावे, अशी विनंती एनसीबीने पोलिसांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. 'चौकशी पथकाला जबाब नोंदवायचा आहे. हे प्रकरण व त्यांनी केलेले आरोप नेकमे काय आहेत, हे चौकशी पथकाला जाणून घ्यायचे आहे. पण सैल चौकशीसाठी बोलवूनही चौकशी पथकासमोर आलेले नाहीत. ते का आले नाहीत?', असा प्रश्न ग्यानेंद्र सिंह यांच्या चौकशी पथकाला पडला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pRtLqu
No comments:
Post a Comment