मुंबई: शंभर कोटीच्या वसुलीचा लेटबॉम्ब टाकणारे आणि वेगवेगळ्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांना चौकशीला उपस्थित राहण्यासाठी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. परमबीर हे सध्या देशात आहेत की परदेशात हे कुणालाच ठाऊक नसल्याने त्यांच्या येथील घरावर ही नोटीस चिकटविण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर रोजी चौकशीला उपस्थित राहावे, असे या नोटिशीतून सांगण्यात आले आहे. ( Mumbai Police Issues Notice To ) वाचा: परमबीर सिंग यांच्यासह तसेच इतर अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून सीआयडी, तसेच गुन्हे शाखा त्यांची चौकशी करीत आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. इतर यंत्रणांबरोबरच गुन्हे शाखेचे अधिकारी देखील परमबीर यांच्या शोधात आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष चौकशी आवश्यक असल्याचे कारण देत गुन्हे शाखेने परमबीर यांना नोटीस धाडली आहे. ही नोटीस घेऊन पोलीस त्यांच्या मलबार हिल येथील घरी पोहोचले. मात्र, घर बंद असल्याने पोलिसांनी ही नोटीस त्यांच्या दरवाज्यावर चिकटवली आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Avlx8W
No comments:
Post a Comment