मुंबई: विषाणूचा अत्यंत वेगाने पसरणारा नवीन व्हेरिएंट काही आफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. ते पाहता मुंबईतील प्रशासन तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने देखील आपापल्या स्तरावर आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. यांनी दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री हे सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तिथूनच त्यांनी आज चहल यांच्याशी चर्चा केली व करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेत काही महत्त्वाचे निर्देश दिले. ( ) वाचा: आफ्रिका खंडातील ज्या देशांमध्ये नवीन कोविड विषाणू आढळला आहे, तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला तर, त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) काटेकोरपणे तपासावे. संबंधित प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसत आहेत किंवा काय याबाबत काटेकोर वैद्यकीय तपासणी करावी, त्याआधारे वैद्यकीय चाचणी देखील करावी. सध्याच्या पद्धतीनुसार त्यांना अलगीकरणाच्या सूचना द्याव्यात. जर एखादा प्रवासी बाधित आढळला तर त्याला तातडीने संस्थात्मक विलगीकरण करावे, बाधित नमुन्यांचे जनुकीय गुणसूत्र (जीनोम सीक्वेन्सिंग) पडताळावे. तसेच बाधिताच्या सानिध्यातील नागरिकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही त्वरेने करावी, अशा सक्त सूचना देखील चहल यांनी दिल्या आहेत. नवीन विषाणूच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील निर्देश दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले. वाचा: कोविड-१९ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून मुंबईसह महाराष्ट्रात कोविड संसर्गजन्य परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. असे असताना जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला नुकताच धोक्याचा इशारा दिला आहे. काही आफ्रिकन देशांमध्ये कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळला असून तो अधिक संसर्गजन्य आहे, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी इक्बालसिंह चहल यांच्याशी चर्चा करून काही निर्देश दिले. याच अनुषंगाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, सर्व सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह पोलीस प्रशासनाचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) , इतर पोलीस अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी, महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, उपनगरीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य या सर्वांची संयुक्त बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आज सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोविड विषाणूचा ओमीक्रोन प्रकार आणि त्या पार्श्वभूमीवर घ्यावी लागणारी खबरदारी या दिशेने सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना चहल यांनी केल्या. मुंबईत उभारण्यात आलेली सर्व जम्बो कोविड सेंटर योग्य क्षमतेने कार्यान्वित राहतील, यादृष्टीने त्यांची पुन्हा फेरपाहणी करावी. वैद्यकीय आणि इतर आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय प्राणवायू निर्मिती व साठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था या सर्व बाबींचा आढावा घ्यावा, अशा सूचना चहल यांनी अधिकाऱ्यांना केल्या. विमानतळ व पोलिसांशी संबंधित विविध विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cU2mfF
No comments:
Post a Comment