म. टा. प्रतिनिधी, जळगाव चाळीसगावचे यांनी औट्रम घाटात केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलिस कर्मचारी वाहनचालकांकडून पैसे उकळत असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीत चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे चार पोलिस कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना आज शनिवारी निलंबीत करण्यात आले. तसे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत. (four policemen have finally been suspended for doing collection in kannada ghat) क्लिक करा आणि वाचा- गणेश वसंत पाटील , प्रकाश भगवान ठाकून, सतिष नरसिंग राजपूत व संदीप भरत पाटील असे निलंबीत केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.औट्रम घाटात ट्रकचालकांकडून बेकायदा पैसे वसूल करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रकचालकाचा वेश करून स्टिंग ऑपरेशन केले. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत दोषी आढळल्यानंतर चारही कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते होते. यामुळे अनेकदा घाट जाम होत होता. घाटात ५ ते १० तास वाहने थांबून राहत होती. गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या एम्ब्युलन्स देखील तासनतास अडकून पडत होत्या. यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव बदनाम होत असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे म्हणणे होते.ॉ क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xwLu8w
No comments:
Post a Comment