ठाणे: संसर्गाच्या या विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. ही स्थिती लक्षात घेत देशपातळीवर आणि राज्यपातळीवर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रविवारी मुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ( ) वाचा: दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून हा व्यक्ती डोंबिवलीत परतला आहे. या प्रवाशाला करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या रुग्णाचे नमुने आज जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच संबंधित रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होईल. संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांचीही उद्या तपासणी केली जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. या रुग्णाला आपल्याला करोनाची लागण झाल्याचे नेमके कळले कुठे, करोनाची लागण झाल्याचे त्याने यंत्रणांना कळवले होते किंवा नाही, याबाबत महापालिका प्रशासन माहिती घेत आहे. वाचा: करोना पॉझिटिव्ह असतानाही प्रवास? केपटाऊन येथून संबंधित व्यक्ती २४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आला. तिथून मुंबई विमानतळ आणि मग असा या व्यक्तीने प्रवास केला. दिल्ली विमानतळावर या व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती व त्याने लगेचच डोंबिवलीत फोन करून याची कल्पना कुटुंबीयांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय नातेवाईकांच्या घरी गेले आहेत तर तो घरात विलगीकरणात राहत होता, असेही सांगण्यात आले. या रुग्णाच्या भावाची करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असेही सांगण्यात आले. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, दिल्ली विमानतळावर करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर या व्यक्तीने तिथून डोंबिवलीपर्यंतच प्रवास कसा केला, हा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lee4WY
No comments:
Post a Comment