: मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात आंबेड बुद्रुक येथे दोन मोटारसायकलची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक २९ वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी ७.३० वाजता घडला. () याबाबत संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात विश्रुत सत्यन नायर (वय-२९) हा जागीच ठार झाला आहे. तसंच ॲक्सिस मोटारसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे दाखल करण्यात आलं आहे. या अपघातातील मृत झालेला विश्रुत नायर हा मूळचा केरळमधील असून तो बँक आँफ इंडियाच्या संगमेश्वर शाखेतील कर्मचारी आहे. विश्रुत हा आपली बुलेट गाडी घेऊन रत्नागिरीहून संगमेश्वरला येत होतात, तर अॅक्सिस मोटारसायकलवरून दोघेजण आंबेडमधून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. या दोन मोटारसायकलची आंबेड बुद्रुक येथे समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हवालदार संतोष झापडेकर व पोलीस शिपाई सोमनाथ आव्हाड यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. विश्रुत नायर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. अन्य दोन जखमींना रत्नागिरी येथे दाखल करण्यात आलं आहे. याबाबतचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3d3jzTT
No comments:
Post a Comment