मुंबई: दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन (Omicron) हा नवा घातक व्हेरिएंट आढळल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या स्थितीमुळे केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून राज्य सरकारही सतर्क झाले आहे. राज्यातील मुंबई हे विमानतळावर असे आहे, जेथे जगभरातून प्रवासी येत असतात. याच कारणामुळे आता मुंबई महानगरपालिकेने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या निर्णयानुसार, आता विमातनळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. शिवाय, करोना रुग्ण आढळल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत. (there will be of passengers at to prevent ) ही माहीती मुंबई महापालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. ओमायक्रॉन या करोनाच्या घातक व्हेरिएंटचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपयाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार विमानतळावर उतरलेल्या सर्वच प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे. काहीही झाले तरी मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला गृह अलगीकरणात राहावेच लागणार आहे. तसेच विमानतळावर करोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळा तर त्याच्यावर स्वतंत्रपणे उपचार करता यावेत यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आणखी काय आहेत महापालिकेच्या उपापयोजना? करोनाच्या नव्या व्हेरिएंटशी मुकाबला करण्यासाठी आता महापालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व रुग्णालयांचे आणि कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक ऑडिट करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे अग्निशमन आणि विद्युत ऑडिट देखील करण्यात येणार आहे. तसेच त्याची संपूर्ण तपासणीही करण्यात येणार आहे. शहरातील व्हेंटिलेटरची स्थिती काय आहे याची तपासणी करुन ते सज्ज ठेवण्यात येणार आहेत. शिवाय या नव्या घातक अशा व्हेरियंटचा एखादा जरी रुग्ण एखाद्या इमारतीत आढळला, तर ती संपूर्ण इमारतच सील करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेचेही खबरदारीचे उपाय नव्या करोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेनेदेखील आपल्या सर्व सर्व वैद्यकीय अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमधून त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या नवी मुंबईतही काही प्रमाणात आहे. हे लक्षात घेता नवी मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांची दर दिवसाआड आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. ही माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3p5XrOr
No comments:
Post a Comment