Breaking

Saturday, November 27, 2021

बायकोची अट पूर्ण करण्यासाठी सुरेन रैनाने घेतला होता धोनीशी पंगा, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं... https://ift.tt/3IaxvKv

पुणे : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका चौधरी यांची प्रेमकथा ही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. या दोघांच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से सांगितले जातात. प्रियांकाची अट मान्य करण्यासाठी रैनाने धोनीच्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष केले होते, हा त्यापैकी एक प्रसिद्ध किस्सा. धोनीचे म्हणणे हवेत उडवत रैनाने ४५ तासांचा हवाई प्रवास केला होता. हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे. २७ नोव्हेंबर १९८६ रोजी मुरादनगर येथे जन्मलेला सुरेश रैना आज ३५ वर्षांचा झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. क्रीडा प्रशिक्षक सतपाल चौधरी हे मुरादनगर येथील शाळेत क्रीडा शिक्षकही होते. रैनाने लहानपणी सतपाल यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. प्रियांका ही सतपाल यांची मुलगी. याच दरम्यान त्याची आणि प्रियंकाची मैत्री झाली. सुरेश रैनाने एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. 'लहानपणी प्रियांकाच्या वडिलांकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. बराच काळ निघून गेला. मी टीम इंडियासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि प्रियंका नेदरलँडमध्ये बँकिंग क्षेत्रात नोकरी करू लागली.' रैनाने लंडनला जाऊन प्रियांकाला प्रपोज केले होते. त्यासाठी त्याने ४५ तास विमानाने प्रवास केला होता. त्याच्या हा वेडेपणा पाहून प्रियंकाही प्रभावित झाली. आणि तिने त्याचे प्रपोजल स्वीकारले. वाचा पूर्ण किस्सा भारतीय संघ त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. आणि प्रियांकाने रैनासमोर एक मोठी अट ठेवली होती. हा खुलासा तिने स्वतः द कपिल शर्मा शोमध्ये केला होता. लग्नाआधीचा किस्सा सांगताना प्रियांका म्हणाली, 'लग्न होण्यापूर्वी तो (रैना) ऑस्ट्रेलियात होता. आम्ही ८ वर्षे एकमेकांना पाहिले नव्हते. जेव्हा लग्नाची वेळ आली आणि तो म्हणाला की, आपण लग्न करू. तेव्हा मी विचार केला की, हे काय करतोय आपण, एकदा एकमेकांना भेटूया.' प्रियांका पुढे म्हणाली की, 'मी क्रिकेट पाहतही नव्हते आणि तेव्हा भारतातही नव्हते. गुगलवर शोधले तेव्हा हरभजन सिंगसोबत याचा फोटो समोर आला. तेव्हा वाटलं की आता भेटायला हवं. लग्नाआधी मला भेटायचं आहे. काहीही कर आणि ये. हे मी त्याला आवर्जून सांगितले. त्यानंतर रैना ४५ तासांचा विमान प्रवास करून ऑस्ट्रेलियाहून लंडनला पोहोचला. त्यावेळी रैनाचा जवळचा मित्र असलेल्या धोनीने इतका लांबचा प्रवास करण्यास मनाई केली होती, पण प्रियांकाच्या प्रेमात वेडा झालेल्या रैनाने आपल्या मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आणि तो लंडनला गेला. त्यानंतर ३ एप्रिल २०१५ रोजी दोघांनी लग्न केले. आज या गोड जोडप्याला ग्रासिया नावाची मुलगी आणि रिओ नावाचा मुलगा देखील आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ldODFa

No comments:

Post a Comment