Breaking

Saturday, November 27, 2021

'गिरीशभाऊ, तुम्ही ज्याला विश्वासघात म्हणता तेच तर...'; खडसेंची फटकेबाजी! https://ift.tt/3lgh853

जळगाव: निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप करून भाजप नेते, माजी मंत्री यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री यांनी खोचक प्रतिक्रिया दिली असून 'गिरीशभाऊ हा विश्वासघात नसून हे तर राजकारण आहे', असा टोला लगावला आहे. ( ) वाचा: राष्ट्रवादी कार्यालयात आज राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, भाजपकडे दिग्गज उमेदवार होते. अनेकांना वाटत नव्हते की आपण कसे जिंकू? गिरीश महाजन १० कोटी खर्च करतील असेही सांगितले जात होते. मात्र, मी एकच सांगितले होते, ते १० करतील तर आपण २० करू पण निवडणूक लढू. मी रुग्णालयात असताना म्हटले होते की, त्यांचा एकही सदस्य निवडून येऊ देणार नाही, आपण जिंकू आणि तसेच झाले. गिरीशभाऊ म्हणतात विश्वासघात झाला पण तसे काही नाही. यालाच राजकारण म्हणतात. आम्ही काही धर्मार्थ दवाखाना चालवत नाही, अशा शब्दांत खडसे यांनी पलटवार केला. राष्ट्रवादीचा जिल्ह्यात एकच आमदार आहे. त्याने जिल्हाभरात दौरे केले पाहिजेत. माझी इच्छा आहे की सागरपार्कवर यांच्या उपस्थितीत लाखोंच्या संख्येचा मेळावा घ्यायचा आणि विरोधकांना आपली ताकद दाखवायची. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी कामाला लागले पाहीजे, असे आवाहनही खडसे यांनी केले. वाचा: महापालिकेत माझ्यामुळे सत्ताबदल जळगाव शहर महापालिकेत भाजपची सत्ता होती. मात्र माझ्यामुळे महापालिकेत सत्ता परिवर्तन झाल्याचा पुनरूच्चार खडसे यांनी केला. आता जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती अशा सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे, वसंतराव मोरे, दिलीप वाघ, मनीष जैन, रवींद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ldPW79

No comments:

Post a Comment