म. टा. विशेष प्रतिनिधी, सोसायटीत पार्किंगसाठी जागा नाही, रस्त्यावर गाडी पार्क केल्यास वाहतूक पोलिसांची कारवाई, या कटकटीतून वाचण्यासाठी आपली वाहने मॉलमध्ये पार्क करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबईतील आठ मॉलनी आपली जागा रात्री ११ ते सकाळी ८ या वेळेत पार्किंगसाठी खुली केली आहे. यामध्ये सुमारे साडेसहा हजार गाड्या पार्क होऊ शकतील. प्रतिवाहन मासिक अडीच हजार ते साडेतीन हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. मुंबईतील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेने 'मुंबई प्राधिकरण' स्थापन केले आहे. या प्राधिकरणामार्फत पार्किंग आणि वाहतूककोंडीच्या समस्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. या नियोजनाचा एक भाग म्हणजे 'शहर सामायिक पार्किंग' हा आहे. त्याअंतर्गत मुंबईतील आठ मॉलनी आपली जागा रात्रीच्या वेळी पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालिकेला कळवले आहे, अशी माहिती पार्किंग प्राधिकरणाच्या नियोजन पथकातर्फे देण्यात आली. भविष्यात मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहनतळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांच्या पार्किंगची सोय केली जाईल. तोपर्यंत पालिकेने अनेक खासगी आणि व्यावसायिक संस्था, निवासी सोसायट्या आणि सरकारी संस्थांना सार्वजनिक पार्किंगसाठी त्यांच्या पार्किंगची जागा सामायिक करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. पार्किंग प्राधिकरण वाहनतळांसाठी मुंबईत मोकळ्या भूखंडांच्या शोधात आहे. या ठिकाणी जमिनीवर किंवा भूमिगत पार्किंग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे गर्दीच्या भागात पार्किंगची वाढती मागणी पूर्ण होईल. तसेच सामायिक पार्किंगसाठी संबंधित जागांचे मालक त्यांच्या इच्छेनुसार जागा देऊ शकतात. जमीनमालक आपल्या सोयीनुसार पार्किंगची वेळ, दर आणि नियम ठरवू शकतील. पार्किंग प्राधिकरण फक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका बजावणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. इथे मिळेल सुविधा... मॉल गाड्या शुल्क संपर्क - ग्रोवेल्स १०१, कांदिवली (पू.)-६५०-प्रतिदिन ३००-०२२ ६६९९ ३००१ - इन्फिनिटी मॉल, अंधेरी (प.)-३२४-दरमहा २,५००-०२२ ४२४४०००० - इन्फिनिटी मॉल, मालाड (प.) ८४७-दरमहा २,५००-०२२ ४२३४०००० - इनॉर्बिट मॉल, मालाड (प.)-७६९-दरमहा २,५००-०२२ ६७०६९५४८ - फिनिक्स मार्केट, कुर्ला (प.)-७३५-दरमहा ९५०-०२२६१८०१०११ - आर सिटी, घाटकोपर (प.)-१८६०-दरमहा ३,५००-०२२६७७५५८३३ - आर मॉल, मुलुंड (प.)-४००- एका रात्रीसाठी ५००-०२२६७५५४१४४ - फिनिक्स पॅलेडियम, लोअर परेल-१,१००हून जास्त-३,५०० दरमहा-०२२ ४३३३ ९९९९
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3p05Q66
No comments:
Post a Comment