Breaking

Thursday, November 25, 2021

दीड कोटींचा टप्पा पार; १०० टक्के मुंबईकरांनी घेतला पहिला डोस https://ift.tt/3xpRhwl

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईने करोना लसीकरण मोहिमेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. करोना प्रतिबंधक लशीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतलेल्यांची संख्या १ कोटी ५५ लाखांवर गेली आहे. पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण शंभर टक्के झाले आहे. त्यात केवळ मुंबईतीलच नव्हे, तर विविध भागांतून आलेल्यांचाही समावेश आहे. दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ६८.२९ टक्क्यांवर गेले आहे. ३२ टक्के मुंबईकरांना दुसरी मात्रा देणे बाकी आहे. मुंबई पालिकेने १६ जानेवारी, २०२१पासून लसीकरण मोहीम राबविल्यास सुरुवात केली असून त्यास उत्तम यश मिळत आहे. ही लसीकरण मोहीम यशस्वी ठरत असतानाच करोना रुग्ण संख्याही घटत चालली आहे. सध्या मुंबईत करोना संख्या २५८ एवढी आहे. एकूण उपचाराधीन रुग्ण संख्या २,३५३ इतकी आहे. आतापर्यंत ७,६१,७७६ रुग्ण करोनाबाधित असून त्यापैकी ७,४०,५४७ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण करोना चाचण्यांची संख्या १ कोटी २२ लाख ३२ हजार ७८० पर्यंत पोहोचली आहे. मुंबईत पालिका, सरकारी आदी मिळून ४६० लसीकरण केंद्रे आहेत. त्यात, आतापर्यंत ९२ लाख ३६ हजार ५०० व्यक्तींना पहिली मात्रा देण्यात आली आहे. लशीचा साठाही पुरेसा आहे. पहिल्या मात्रेचे लक्ष्य गाठले, त्याच धर्तीवर दुसऱ्या मात्रेसाठी तत्परता गरजेची आहे. लसीकरणासोबतच निर्बंधांच्या पालनावरही पालिकेचा भर आहे. ठाणे महापालिकेने लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा इशारा दिला आहे. टीएमटीने प्रवास करण्यासाठी किमान एक डोस बंधनकारक आहे. महाविद्यालयांमध्ये लसीकरण करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक वर्गासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविली. लाभार्थ्यानुसार पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करणारी महापालिका ठरली. आधार कार्ड नसलेल्यांसाठीही शिबिर राबविण्यात आले. भिवंडी महापालिकेने चार महिन्यांपूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांना लस घेण्याचे आवाहन केले होते. लसीकरण केले नसेल तर त्याचे वेतनही रोखण्याचा निर्णय झाला आहे. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही. उल्हानगर महापालिकेने लसीकरण वाढावे यासाठी विशेष कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. वसई-विरारमध्ये लस उपलब्ध असतानाही शहरातील सहा हजार नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. पालिकेकडून लस घेण्यासाठी विनवण्या केल्या जात आहेत. लस घेतली नसेल तर वाहतुकीच्या सेवांवर निर्बंध घालण्यासारख्या युक्त्या केल्या जात आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cN23Dx

No comments:

Post a Comment