Breaking

Friday, November 26, 2021

VIDEO: कातळवाडी ग्रामस्थांनी उभारलाय डॉ. अजित कुमार देवचा पुतळा https://ift.tt/3cY8tiZ

मुंबई: ‘देवमाणूस’ या मालिकेनं खूप चांगला टीआरपी मिळवला. अनेक प्रेक्षक न चुकता ही मालिका पाहत होते. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचंदेखील खूप कौतुक झालं. किरणने '' बनून प्रेक्षकांच्या मनात ओळख निर्माण केली. सगळ्यांचा लाडका हा 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. देवमाणूसच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. किरण गायकवाडनं एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत कातळवाडीतील ग्रामस्थांनी देवमाणसाचा म्हणजेच डॉ. अजित कुमार देवचा पुतळा उभारला आहे. पहिल्या भागाचा शेवट हा अनुत्तरीत राहिला होता. 'देवमाणूस पार्ट २' येणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. मालिका निरोप घेणार असल्याचं वातावरण तयार करण्यात आलं होतं. कलाकारांचे भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण अशाप्रकारे मालिका संपवल्यानं प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3r9lFdr

No comments:

Post a Comment