कल्याण: नायजेरियातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांपैकी एकाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या कुटुंबातील इतर तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या तिघांना आज विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले आहे. (omicron news latest update one has been infected with in kalyan dombivali) कल्याण डोंबिवली महापालिकेने हाती घेतलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत ४ जणांचे एक कुटुंब नायजेरियातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास मिळाली होती. त्यानंतर २ डिसेंबर रोजी या चारही जणांची RTPCR चाचणी करण्यात आली. दिनांक ३ डिसेंबर रोजी चारही जण RTPCR पॉझिटीव्ह आढळून आले होते. या कुटुंबापैकी पती-पत्नी दोघांचेही कोविड लसीकरणाचे दोनही डोस झालेले आहेत. उर्वरित दोघांपैकी एक दहा वर्षाचा मुलगा व एक ६ वर्षाची मुलगी आहे. क्लिक करा आणि वाचा- या कुटुंबास महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिम येथील विलगीकरण कक्षात दिनांक ३ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले होते. आज त्यापैकी ४५ वर्षीय पुरुषाचा चाचणी अहवाल ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आला आहे. तथापी सदर कुटुंबातील चारही व्यक्तींचा RTPCR चाचणी अहवाल, विलगीकरण कक्षातील उपचाराअंती निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज दुपारी महापालिकेच्या विलगीकरण कक्षातून डिसचार्ज देण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- या कुटुंबातील व्यक्तींचा एकूण ८६ लोकांशी संपर्क आलेला होता. यातील २४ हाय रिस्क Contact व ६२ लो रिस्क Contact होते. या ८६ लोकांचा शोध घेण्यात आला. यांपैकी ४ निकट सहवासितांचे RTPCR पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता कोविड अनुरुप वर्तनाचा कटाक्षाने अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yBmNrL
No comments:
Post a Comment