Breaking

Sunday, December 26, 2021

राज्यात करोना रुग्ण का वाढत आहेत?; आजच्या आकड्यांनी चिंता वाढवली https://ift.tt/32BnHIO

मुंबई: राज्यात आज रविवारी ओमिक्रॉनचे ३१ नवे रुग्ण आढळून आल्याने राज्यात चिंतेचे वातावरण असताना तरी दुसरीकडे मात्र करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असल्याने ही चिंता अधिकच वाढली आहे. आज राज्यात एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९१८ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज १ हजार ६४८ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात आज ९ हजार ८१३ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (maharashtra registered 1648 new cases in a day with 918 patients recovered and 17 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ६५ लाख ०२ हजार ९५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ८४ लाख ५५ हजार ३१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ५७ हजार ८८८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ९.७३ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ८९ हजार २५१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ४३३ इतकी आहे. मुंबईत आज ८९६ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज रविवारी ८९६ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ७० हजार ०१० इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये २ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३७० इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण १९८ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज रविवारी १९८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात १५, ठाणे महापालिका क्षेत्रात ६७, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ६६, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात २७, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ३, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात १, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात १९ रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज १० रुग्ण आढळले असून, वसई विरार मनपा क्षेत्रात २०, रायगडमध्ये १६ आणि पनवेल मनपा क्षेत्रात ४० नवे रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3psMIPx

No comments:

Post a Comment