Breaking

Sunday, December 26, 2021

जोतिबाच्या नावानं चांग भलं! विशाल निकम ठरला बिग बॉस ३ चा विजेता https://ift.tt/3mwTTEk

मुंबई: प्रेक्षकांचा आवडता आणि लाडका ज्याचे घरात नेहमीच कौतुक झाले असा विशाल निकम बिग बॉस मराठी सिझन ३ चा विजेता ठरला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर विशाल निकमनं सिझन तीनच्या विजेत्याचा किताब पटकावला आहे. जय आणि विशाल हे दोघेही अंतिम फेरीत पोहोचले आणि विजेता म्हणून विशालचं नाव घोषित करण्यात आलं. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात विशाल निकम, विकास पाटील, मिनल शहा, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे पोहोचले. कोण आहे विशाल निकम?विशालचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी सांगली जिल्ह्यातील देवखिंडी येथे झाला. विशालला अभिनयासोबतच फिटनेसची देखील आवड आहे. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत अमृता धोंगडे ही अभिनेत्री होती. त्यानंतर विशालनं धुमस या मराठी सिनेमातही काम केलं. परंतु विशालला लोकप्रियता मिळाली ती दख्खनचा राजा ज्योतिबा आणि जय भवानी जय शिवाजी या टीव्ही मालिकांमुळं. आता बिग बॉस मराठी ३ घरात आल्यानंतर त्याचा चाहतावर्गही वाढला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3HgxUJJ

No comments:

Post a Comment