मुंबई: देशात व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. त्यात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असून राज्य सरकारने कठोर पावले टाकत शुक्रवारी नव्याने अनेक निर्बंध लागू केले आहेत. याबाबत जारी करण्यात आल्या असून त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेनेही रात्री उशिरा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत सेलिब्रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मोकळ्या वा बंदिस्त जागेत एकत्र येऊन कोणतीही पार्टी वा अन्य कार्यक्रम करण्यास मनाई असेल असे नमूद करण्यात आले असून आज मध्यरात्रीपासून (२५ डिसेंबर) क्षेत्रात हे आदेश लागू असणार आहेत. ( ) वाचा: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ६८३ नवीन रुग्ण मुंबईत आढळले आहेत. ६ ऑक्टोबरनंतरची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. त्याचवेळी मुंबईतील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही बाब लक्षात घेत मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. आधीच पालिकेने अनेक प्रतिबंधात्मक पावले उचलली असून निर्बंधांबाबत राज्य सरकारच्या नवीन गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्यानंतर काही तासांतच मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी न्यू ईयर सेलिब्रेशनबाबत मोठा निर्णय घेतला. वाचा: मुंबईत थर्टी फर्स्टच्या रात्री जल्लोष पाहायला मिळतो. गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी तसेच इतर ठिकाणी मोठी गर्दी उसळते. त्याचवेळी पंचतारांकित हॉटेल्स व अन्य ठिकाणीही न्यू ईयर पार्ट्यांची रेलचेल असते. ओमिक्रॉनचा धोका पाहता हे सेलिब्रेशन संसर्गाचा अधिक फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन पालिकेने कठोर पाऊल उचलत या सेलिब्रेशनला प्रतिबंध केला आहे. याबाबत पालिका आयुक्तांनी आदेश जारी केला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात नववर्षानिमित्त कोणताही कार्यक्रम, समारंभ, पार्टी, संमेलन आयोजित करण्यात पूर्णपणे मनाई असेल. बंदिस्त वा मोकळ्या जागेत असे कोणतेही आयोजन करता येणार नाही. त्यासोबतच राज्य सरकारने जारी केलेल्या सर्व गाइडलाइन्सही मुंबईत लागू असणार आहेत. हा आदेश आज (२५ डिसेंबर) मध्यरात्रीपासून मुंबई महापालिका क्षेत्रात लागू असेल, असे चहल यांनी नमूद केले आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून आदेशाचा भंग केला गेल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही चहल यांनी बजावले आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FtENan
No comments:
Post a Comment