Breaking

Friday, December 24, 2021

लुधियाना स्फोट: 'सुसाइड बॉम्बर'ची ओळख पटली; कारागृहातून सुटका होताच... https://ift.tt/3svA1Fs

लुधियाना: प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले असून त्याचे नाव असे होते आणि त्याला दलातून बडतर्फ करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानेच हा स्फोट घडवून आणल्याचेही उपलब्ध पुराव्यांवरून दिसत असले तरी आम्ही अधिक पुरावे गोळा करत आहोत व विविध अंगांनी या घटनेचा तपास केला जात आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ( ) वाचा: जवळ आल्याने राजकारण तापलं असतानाच लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाने एकच खळबळ उडाली. या घटनेवरून अनेक दावे केले गेले आणि राजकारणही तापले. केंद्राकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या घटनेबाबत पंजाब सरकारकडे अहवाल मागण्यात आला तर अधिक तपासासाठी एनएसजी आणि एनआयए पथकही लुधियानात पाठवण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर तपासातून आता वेगळीच माहिती समोर आली आहे. वाचा: स्फोटात जी व्यक्ती ठार झाली आहे त्याचे नाव गगनदीप सिंग होते. लुधियाना कोर्ट इमारतीत बॉम्ब ठेवत असतानाच स्फोट झाल्याने त्यात गगनदीपचा मृत्यू झाला, असे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. गगनदीप हा पंजाब पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल होता. ड्रग्ज तस्करी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. ड्रग्ज प्रकरणात कोर्टाने त्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. याचवर्षी सप्टेंबर महिन्यात त्याची कारागृहातून सुटका झाली होती, असेही सांगण्यात आले. अशी पटली ओळख... एनआयए आणि लुधियाना पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यात डेटाकार्ड व टॅटू महत्त्वाचे ठरले. टॅटूवरूनच गगनदीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांची मदत घेण्यात आली. आता तपास यंत्रणा अन्य शक्यताही तपासून पाहत आहेत. गननदीप याने हा स्फोट नेमका का घडवला, त्याला यासाठीचे प्रशिक्षण कुणी दिले, त्याच्यामागे कुणाचा हात आहे का, याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, या स्फोटात अन्य पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही देण्यात आली. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30VVyMe

No comments:

Post a Comment