दापोली: दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला बाबासोबत आपल्या गावी पिसईला आलेला एक अडीच वर्षीय बालक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी रत्नागिरीहून श्वान पथक मागितले असून ते दापोलीकडे येण्यास निघाले आहे. (a two and a half year old boy has gone missing from village in ) दापोली तालूक्यातील पिसई येसरे वाडी येथे श्री दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला नाशिक येथून आपल्या गावी पिसईला आपल्या बाबासोबत आलेला लक्ष अंकेश अंबावले वय २ वर्ष ५ महिण्याचा बालक रविवारी १९ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या घरी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खेळत असताना अचानकपणे बेपत्ता झाल्याने एकच खबबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा- पिसई येथील मुळ रहीवाशी असलेले अंकेश अंबावले हे आपल्या कुटूंबासह कामानिमित्त नाशिक येथे राहतात. काही सार्वजनिक अथवा खाजगी कार्यक्रम असल्यावर ते सण उत्सव अथवा कार्यक्रमासाठी आपल्या गावी ते येत असतात. असेच आपल्या पिसई येसरे वाडीतील दत्त जयंती उत्सवासाठी नाशिकहून गावी उत्सवासाठी आलेले होते. पत्नीला सुट्टी नसल्याने व मुलगा पाठी लागल्याने ते मुलगा लक्ष याला गावी घेवून आले. श्री.दत्त जयंती उत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर रात्रभर तो देवळातच होता. पहाटे काकड आरती झाल्यावर वडील अंकेशसह गावी राहणारे नातेवाईक हे घरी आले. क्लिक करा आणि वाचा- रात्रभर उत्सवाचे जागरण असल्याने कोणी घरात झोपले होते, तर कुणी नास्टापाणी तसेच अंघोळीचे पाणी तापवण्याच्या कामास लागले होते. यावेळी लक्ष हा आपल्या घराच्या परिसरात फिरत होता. भूक लागली म्हणून तो केळे हातात घेवून खातही होता. पाणी तापवून झाल्यानंतर वडील अंकेश हे त्याला आपल्या सोबत अंघोळीसाठी आणण्यासाठी गेले तेव्हा तो त्यांना कोठेही आढळून आला नाही. त्यामुळे प्रथम त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. त्यानंतर शेजारी तसेच मुंबई व गावातील जवळपास दिड ते दोनशे पेक्षा अधिक लोकांनी सर्व परिसर पिंजून काढला. मात्र त्यांना लक्ष कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर सायंकाळी दापोली पोलिस ठाण्यात येवून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार लक्ष याचे वडील अंकेश यांनी दाखल केली. दापोली पोलिस ठाण्यात भादवी कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तत्काल याची दखल घेत दापोली पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक नितिन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पिसई येथे जावून मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला रात्र झाल्याने शोध कार्यात अडचणी येत आहेत. क्लिक करा आणि वाचा- लक्ष हा अंकेश अंबावले दाम्पंत्याचा एकुलता एक मुलगा आहे. दत्त जयंतीच्या कार्यक्रमालाच ही घटना घडल्याने पुढील कार्यक्रमावर दुःखाचे सावट कोसळले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30FULPo
No comments:
Post a Comment