बेंगळुरू: बेंगळुरू येथील सदाशीवनगरात यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सीमाभाग आणि महाराष्ट्रात उमटले आहेत. बेळगावात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला तर महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे येथे कनार्टकातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले. शिवप्रेमींचा हा उद्रेक कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना खटकला असून कन्नड नागरिकांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही त्यासाठी आवश्यकती पावले उचलू असे म्हटले आहे. दरम्यान, शिवरायांचा कणभरही अनादर खपवून घेतला जाणार नाही, असे ठणकावतानाच बेंगळुरूतील घटनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे व कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केली आहे. ( ) वाचा: बेंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वप्रथम बेळगावात उमटले. तिथे क्रांतीवीर यांच्या पुतळ्याला लक्ष्य करण्यात आले. शहरात हिंसक जमावाने पोलिसांच्या गाड्या तसेच इतर सरकारी वाहनांनाची तोडफोड केली. त्यानंतर शनिवारी महाराष्ट्रातील अनेक भागांतही शिवरायद्वेष्ट्या कन्नडी समाजकंटकांविरुद्ध शिवप्रेमींचा संताप उफाळून आला. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील सांगली शहर, मिरज, जत, इस्लामपूर, विटा येथे व पुणे शहरात कर्नाटक राज्य परिवहन सेवेच्या बस तसेच कर्नाटकातील खासगी वाहनांना लक्ष्य करण्यात आले. कोल्हापुरात काही ठिकाणी कन्नडीगांच्या दुकानांवर दगडफेक झाली तर दुकानांवरील कन्नड फलकही हटवण्यात आले. त्यावरूनच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नाराजी व्यक्त केली असून आता या संपूर्ण वादाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. वाचा: महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होणे ही निश्चितच गंभीर बाब आहे. यातील दोषींना आम्ही सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. त्या दोन्ही प्रकरणांत आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचाही शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचवेळी दोन्ही बाजूने संयम दाखवण्याची आवश्यकता आहे. हिंसक घटनांना कुणीही प्रोत्साहन देऊ नये असे, सांगत बोम्मई यांनी महाराष्ट्राकडे बोट दाखवले. वाचा: कर्नाटकच्या बसेस आणि खासगी वाहनांवर महाराष्ट्रात दगडफेक केली गेली आहे. कर्नाटकविरुद्ध आणखीही काही हिंसक घटना घडल्या आहेत. याबाबत कर्नाटकचे पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशी बोलतील. त्याचवेळी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि आमचे गृहमंत्री महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांशी बोलणार आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जशी आमची जबादारी आहे तशीच महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड नागरिकांना संरक्षण देणं ही तेथील सरकारची जबाबदारी आहे, असे बोम्मई यांनी सांगितले. शिवसेना नेते यांनी बेंगळुरूच्या घटनेचा निषेध करताना 'उठ मराठ्या उठ' अशी हाक मराठी भाषिकांना दिली आहे. त्याबाबत विचारले असता जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी प्रक्षोभक विधाने टाळायला हवीत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी लक्ष घालावे: मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंगळुरूमधील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी या घटनेवर दिली. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3q9h7S7
No comments:
Post a Comment