: चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा बुधवारी पार पडला. या सोहळ्याला भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते , माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार हेदेखील उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना संभाजीराजेंनी केलेल्या एका वक्तव्याची आता जोरदार चर्चा होत आहे. ( On ) 'देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की शिवाजी महाराजांचे आचारविचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचला पाहिजे,' असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. आरक्षणाबाबत केलं आवाहन या सोहळ्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय राजकारण्यांना मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे. 'शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. पण सध्या महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व इतर आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, या प्रश्नांमुळे दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू असून सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकारण-राजकारणाच्या ठिकाणी, पण आता महाराष्ट्राची ओळख जपण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे,' असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. दरम्यान, यावेळी व्यासपीठावर उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, संजय सावककारे, चंदूभाई पटेल, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंदभाई पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह चाळीसगाव नगरपालिकेचे नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FDU4Wf
No comments:
Post a Comment