Breaking

Wednesday, December 29, 2021

शरद पवार अन् जनतेने मला झोळी फाटेपर्यंत दिलं; मुश्रीफांचं प्रत्युत्तर https://ift.tt/3FLzLGs

कोल्हापूर : ‘गेली १५ वर्षे मी राज्य मंत्रिमंडळात आहे. दोन वर्षांपासून आहे. यामुळे मला कोणी काय दिलं यापेक्षा कागलच्या जनतेने आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मला झोळी फाटेपर्यंत दिलं आहे. यामुळे आता मला फारशी कोणत्या गोष्टीची अपेक्षा राहिलेली नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री यांनी शिवसेनेचे खासदार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. () कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्तारुढ ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’चा प्रचार मेळावा बुधवारी कोल्हापुरात झाला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस आणि भाजप व मित्रपक्ष अशी आघाडी झाली आहे. तर शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल उभं केलं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडली आहे. शिवसेनेचे खासदार प्रा. मंडलिक यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्री मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेने मुश्रीफांना झोळी भरून दिले, आता ते आमचा हात मागत आहेत, अशा शब्दात त्यांना टीकेची झोड उठवली होती. याला मुश्रीफ यांनी उत्तर देताना शिवसेनेने नव्हे तर पवारांनी झोळी भरून दिल्याचा प्रतिटोला लगावला आहे. मुश्रीफ म्हणाले की, ‘२०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाली. विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याविषयी शब्द पाळला नाही. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सहकार्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. दोन वर्षापासून महाविकास आघाडीत मी मंत्री आहे. शिवाय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गेली १५ वर्ष मंत्री आहे. यामुळे मला कोणी काही दिले असेल तर ते कागलच्या जनतेने आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिलं आहे. अगदी झोळी फाटेपर्यंत दिलं आहे. यामुळे कशाची अपेक्षा राहिली नाही.' दरम्यान, यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने यांची भाषणे झाली. व्यासपीठावर आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील उपस्थित होते. राजेश लाटकर यांनी उमेदवारांचा परिचय करुन दिला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/340MHKl

No comments:

Post a Comment