: राज्यातील ओमिक्रॉनबाधित ( Variant) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुणे जिल्ह्यातही या आजाराचा विळखा घट्ट होताना पाहायला मिळत आहे. नारायणगाव परिसरातून एकूण १६ जण दुबईला गेले होते. दुबईहून पुन्हा पुण्यात परतल्यानंतर यातील ७ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. () दुबईहून परतलेल्या या प्रवाशांची ११ आणि १२ डिसेंबर रोजी नारायणगाव जुन्नर येथे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर NIV चा अहवाल आज हाती आला. या अहवालातून सात जणांना ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. बाधित रुग्णांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे ७ रुग्ण तब्बल ६० ते ७० जणांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मागील शनिवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता ओमिक्रॉनचे एकाच वेळी सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yzUdXM
No comments:
Post a Comment