Breaking

Monday, December 27, 2021

हल्लेखोरांकडे पिस्तूल आणि तलवारी; खडसेंनी दिली खळबळजनक माहिती! https://ift.tt/3FAS4h8

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते यांच्या कन्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा यांच्या वाहनावर सोमवारी रात्री हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असताना एकनाथ खडसे यांनीही संताप व्यक्त केला आहे. () 'हल्लेखोरांकडे पिस्तूल व तलवारी अशी शस्त्र होती. हल्ला कुणी केला हे माहीत असले तरी मी ते आता सांगणार नाही. पोलीस तपासात ती माहिती समोर येईल,' असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसंच सध्या मी प्रवासात आहे. या हल्ल्याप्रकरणी रोहिणी खडसे तक्रार दाखल करतील, असंही ते म्हणाले. गृहमंत्र्यांसह अजित पवारांनाही दिली माहिती रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहिती दिल्याचं खडसे यांनी सांगितलं आहे. नेमकं काय घडलं? रोहिणी खडसे या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर फरार झाले. हल्लेखोरांची संख्या पाच असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याची माहिती मिळाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mBGoU3

No comments:

Post a Comment