Breaking

Tuesday, December 28, 2021

'खुन्नस दिली' म्हणत तरुणाचा गळा कापला, लागोपाठ घडलेल्या २ घटनांनी नागपूर हादरलं https://ift.tt/3pxTEuI

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शहरात दोन विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन तरुणांची हत्या करण्यात आली. यातील एका तरुणाची तर एकमेकांकडे बघितल्याने, ‘खुन्नस दे रहा क्या?’ या क्षुल्लक वादातून हत्या करण्यात आली. तर अन्य एका घटनेत एका तरुणाची हत्या करून मारूती ओम्नीमध्ये त्याचा मृतदेह टाकून आरोपी पसार झाल्याचे समोर आले आहे. यातील पहिली घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम परिसरात सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. अनिकेत सुनील तांबे (वय २५, रा. मोहननगर, खलासी लाईन) असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी जय अशोक सोमकुंवर (वय २८) आणि भूषण सुखदेव सोमकुवर (वय २६, रा. दोघेही रा. गड्डीगोदाम, गौतमनगर) या दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. अनिकेत हा रात्रीच्या सुमारास गौतमनगर परिसरात कोल्ड्रिंक पिण्यास गेला होता. यावेळी आरोपी तेथेच होते. अनिकेतचा आरोपींसोबत जुना वाद असल्याचे सांगितले जाते आहे. यावेळी आरोपी आणि अनिकेतची नजरा नजर झाली. ‘खुन्नस दे रहा’ या गैरसमजातून वाद सुरू झाला. रागाच्या भरात आरोपींनी चाकुच्या सहाय्याने अनिकेतचा गळाच कापला. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि जागीच मरण पावला. पोलिसांनी सोमकुंवर बंधुंना अटक केली आहे. व्हॅनमध्येच सापडला मृतहेद याखेरीज अन्य एका घटनेत हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह ओम्नी व्हॅनमध्ये टाकून दिल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास समोर आली. गुमगांव येथे मारोती व्हॅन मध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची सूचना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. धीरज ज्ञानेश्वर माकोडे (वय २४, रा. गुमगांव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मारोती व्हॅन क्रमांक एमएच ३१-एफए ३९९५ क्रमांकाच्या गाडीत रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे समोर आले आहे. त्याच्या हत्येमागील कारण तसेच आरोपी अद्याप अज्ञात असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mGhov0

No comments:

Post a Comment