Breaking

Saturday, December 18, 2021

ओमिक्रॉनमुळे भारतात येणार करोनाची तिसरी लाट; कमिटीने महिनाही सांगितला https://ift.tt/3q6ElIr

नवी दिल्ली: भारताच्या सुपरमॉडेल कमिटीने संसर्गाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठी शक्यता व्यक्त केली आहे. २०२२च्या सुरुवातीला देशात येऊ शकते आणि फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळू शकतो, अशी भीती सुपरमॉडेल कमिटीने बोलून दाखवली. त्याचवेळी करोनाच्या दुसऱ्या लाटेइतकी तिसरी लाट घातक नसेल. मृत्यूंचे प्रमाण कमी राहील, असेही कमिटीने नमूद केले आहे. ( ) वाचा: भारतात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या सध्या साडेसात हजारांच्या आसपास आहे. यात बहुतांश रुग्ण डेल्टा बाधित आढळत आहेत. डेल्टाची जागा येत्या काही दिवसांत घेऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळेल आणि तिथूनच करोना संसर्गाची तिसरी लाट सुरू होईल, अशी स्पष्ट शक्यता राष्ट्रीय प्रमुख विद्यासागर यांनी व्यक्त केली. वाचा: देशात पुढील वर्षी सुरुवातीला करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी घातक असेल, असा अंदाज आहे. तिसरी लाट येणार हे जवळपास निश्चित आहे. तरीही भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले असल्याने त्याचा मोठा फायदा होईल. या लाटेची तीव्रता अधिक जाणवणार नाही, असेही विद्यासागर यांनी पुढे नमूद केले. विद्यासागर यांनी सीरो-सर्व्हेवर बोट ठेवले. सीरो-सर्व्हेनुसार एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास डेल्टाची लागण होऊन गेली अशा लोकांची संख्या मोठी आहे. अगदी काही टक्के लोकांनाच विषाणूची लागण झालेली नाही. हीसुद्धा आपल्यासाठी जमेची बाजूच म्हणावी लागेल, असे विद्यासागर म्हणाले. करोनाच्या दोन लाटा भारताने झेलल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचे काम झाले आहे. ते पाहता तिसरी लाट आली तर त्याचा मुकाबला करण्याची आपली तयारी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रुग्णसंख्या वाढ नेमकी किती होईल हे आताच सांगता येणार नाही. नैसर्गिक प्रतिकारशक्ती, लसीकरणाच्या माध्यमातून मिळालेली प्रतिकारशक्ती या गोष्टीचा किती फायदा होतो यावरही बऱ्याच गोष्टी विसंबून आहेत, असे ते पुढे म्हणाले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33GquRM

No comments:

Post a Comment