Breaking

Saturday, December 25, 2021

चाकूचा धाक दाखवत बॅंक मॅनेजरलाच लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद https://ift.tt/3sDjeAr

डोंबिवली: परिसरात एका बॅंक कर्मचाऱ्याला लुटण्याच्या प्रकार घडला आहे. चाकूचा धाक दाखवित एका बँक मॅनेजरला लुटण्याची धक्कादायक घटना ठाकुर्ली परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी मास्क लावून स्वतःची ओळख लपवली आहे. या घटनेनंतर रामनगर पोलिसांनी पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.यापूर्वीही ठाकुर्ली मधील ९० फुटी आणि समांतर रस्त्यावर रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात एक पोलीस चौकी उभी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (a by robbers in area Incident captured on CCTV) क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील एका खाजगी बँकेत मॅनेजर पदावर हे ठाकुर्ली परिसरातील चामुंडा गार्डनमध्ये राहतात. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांच्या आसपास संतोषकुमार ९० फुटी रस्त्याने घरी जात होते. यावेळी मास्क परिधान केलेल्या चार ते पाच लुटारूंनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि काही क्षणांतच घेरले. त्यांच्या गळ्यावर चाकू लावत आणि धमकी देत त्यांना लुटले. त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल, क्रेडिट कार्ड, येस बँकेचे एटीएम घेऊन ते सर्व लुटारू तेथून पसार झाले. क्लिक करा आणि वाचा- संतोषकुमार शर्मा यांनी या लुटीची पोलिसांना तातडीने खबर दिली आणि रामनगर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.पोलिसांनी लगेच परिसरातील सीसीटीव्ही चेक केले आणि अधिक तपास सुरु केला. दरम्यान सीसीटीव्ही मध्ये पाच आरोपी स्पष्टपणे दिसत आहे.त्यातील एका चोरट्याकडे लुटलेली बॅग आहे. दरम्यान यापूर्वीही ठाकुर्ली मधील ९० फुटी आणि समांतर रस्त्यावर रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात एक पोलीस चौकी उभी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3psCUFc

No comments:

Post a Comment