Breaking

Saturday, December 25, 2021

कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याची मोदींची घोषणा; त्यावर मुख्यमंत्री म्हणतात... https://ift.tt/3yUXwZW

मुंबई: (PM Narendra Modi) यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना देण्याच्या केलेल्या घोषणेचे (CM Uddhav Thackeray) यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. ( has welcomed the announcement of of vaccine by ) पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित करताना आज महत्वाच्या घोषणा केल्या. त्यात डॉक्टर्स आणि फ्रंट लाइनर्सना बू्स्टर डोस देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार, देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना हा बूस्टर डोस १० जानेवारीपासून दिला जाणार आहे. क्लिक करा आणि वाचा- तसेच देशातील १५ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी येत्या ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणाही पंतप्रधानांनी आज केली. या बरोबरच वयाच्या ६० वर्षांवरील सहव्याधीग्रस्त जेष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस दिला जाणार असल्याची घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली. हा डोस १० जानेवारीपासूनच देण्यात येणार आहे. भारतातील ६१ टक्केपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर ९० टक्के नागरिकांना लसचा किमान एक डोस मिळाला आहे. देशात १६ जानेवारी रोजी लसीकरण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत एकूण १४१ कोटी डोस देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3prR89f

No comments:

Post a Comment