: कौटुंबिक वादातून एका व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) रविवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला आरोपींना बेड्या ठोकल्या असून, दोन मुख्य आरोपी फरार आहेत. उल्हासनगरमधील कॅम्प ३ मधील रेल्वे स्थानक परिसरात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आनंद श्रीहरी तेलगू उर्फ शेट्टी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रवी गाजंगे आणि जाफर अशी दोन मुख्य आरोपींची नावे आहेत. यापैकी रवी गाजंगे याच्या पत्नीला आनंद शेट्टी हा मुलगी मानत होता. मात्र रवी आणि त्याची पत्नी यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून रवीची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यामुळे तिला मुलगी मानणाऱ्या आनंद तेलगू यांनी रवी गाजंगे याच्या आईला जाब विचारला. सुनेला नीट का वागवत नाही? अशी विचारणा करत शिवीगाळ केली होती, अशी माहिती पोलिसांना तपास करत असताना मिळाली. रवी याला या गोष्टीचा राग आल्याने त्याने त्याची आई, अन्य साथीदार जाफर आणि आणखी एका महिलेला सोबत घेत रविवारी रात्री आनंद तेलगू यांना उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात गाठले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. या घटनेनंतर रवी गाजंगे आणि जाफर हे फरार झाले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत रवी याची आई आणि अन्य एका महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. तर रवी आणि जाफर यांचा शोध घेण्यासाठी २ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. रवी गाजंगे आणि जाफर हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना यापूर्वी तडीपार देखील करण्यात आल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mlpYz2
No comments:
Post a Comment