Breaking

Wednesday, January 19, 2022

CM चन्नी यांचा गंभीर आरोप; 'मोदींना माघारी जावे लागले म्हणूनच...' https://ift.tt/33PWouY

चंदीगड: 'पंजाबमधून यांना दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले असेल तर त्यात माझी काय चूक?, माझ्यावर सूड का उगवला जात आहे?', असे गंभीर सवाल करत पंजाबचे मुख्यमंत्री यांनी आज ईडीच्या कारवाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ( ) वाचा: पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अवैध वाळू उपसा प्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग उर्फ हनी याच्या घरावर छापा टाकण्यात आला असून त्यात ८ कोटी रुपये इतकी रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईच्या अनुषंगाने आज चन्नी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. वाचा: केंद्रातील भाजप सरकार मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मार्फत राज्यात छापासत्र चालवलं गेलं आहे. यामागे मोठं कारस्थान असून निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हे सगळं सुरू आहे, असा आरोप चन्नी यांनी केला. चन्नी यांनी इतर राज्यांत निवडणुकीच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईचे दाखले दिले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी यांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहचले. त्यांच्यावर दबाव टाकला गेला. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यात आले. तामिळनाडूत स्टॅलिन यांच्या नातेवाईकांच्या बाबतीतही हा प्रकार घडला. ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा अशाप्रकारे गैरवापर सुरू आहे. निवडणुका जिंकण्यासाठी हे सगळं चाललं आहे. पण हा डाव यशस्वी होणार नाही, असे चन्नी यांनी बजावले. वाचा: पंजाबने नेहमीच दिल्लीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुघलांच्या काळापासून आजतगायत पंजाब दिल्लीपुढे कधी झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही, असा इशाराच चन्नी यांनी दिला. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दाही त्यांनी या सर्वाशी जोडला. 'मी जिवंत परतू शकलो', असे विधान करून पंतप्रधान पंजाब आणि शेतकऱ्यांची बदनामी का करत आहेत?, असा सवाल चन्नी यांनी विचारला. फिरोजपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा होऊ शकली नाही म्हणून माझ्यावर राग काढला जात आहे का?, असा सवालही त्यांनी केला. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात त्यांना यश आले नाही, असा आरोपही चन्नी यांनी केला. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qGmsSd

No comments:

Post a Comment