पार्ल : पहिल्या वनडेमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पाच चुकांमुळे भारताला हा पराभव पत्करावा लागल्याचे आता समोर आले आहे. पहिली चूक...भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. भारताने यावेळी दक्षिण आफ्रिकेची ३ बाद ६८ अवस्था केली होती. त्यामुळे भारत दक्षिण आफ्रिकेला कमी धावांमध्ये गुंडाळेल, असे वाटत होते. पण या तीन विकेट्सनंतर भारताला सामन्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. भारताकडून आजच्या सामन्यात घडलेली ही पहिली चूक ठरली. दुसरी चूक...टेम्बा बवुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी शतकं झळकावत भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. भारताच्या गोलंदाजांचा हे दोघेही समाचार घेत असताना संघात वेंकटेश अय्यर या सहाव्या गोलंदाजाला स्थान देण्यात आले होते. पण यावेळी राहुलने त्याला एकही षटक टाकायला दिले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या या दोन्ही फलंदाजांनी भारताच्या भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांच्या गोलंदाजीवर चांगल्या धावा जमवल्या. भारताकडून ही तिसरी चूक घडली. तिसरी चूक...दक्षिण आफ्रिकेच्या २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नसली तरी शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. त्याचबरोबर या दोघांनी आपली अर्धशतकंही झळकावली. त्यामुळे हे दोघेही स्थिरस्थावर झाले होते. यापूर्वी या दोघांनी स्थिरस्थावर झाल्यावर संघाला एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. पण या सामन्यात अर्धशतक झळकावल्यावर मात्र दोघांनीपैकी एकालाही मोठी खेळी साकारून संघाला विजय मिळवून देता आला नाही. चौथी चूक...विराट कोहली आणि शिखर धवन जेव्हा बाद झाले तेव्हा भारताची ३ बाद १५२ अशी चांगली स्थिती होती. पण त्यानंतर फलंदजाली आलेल्या तीनपैकी एकाही भारताच्या फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. श्रेयस अय्यर,रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर हे काही धावांतच बाद झाले आणि भारताचा पराभव निश्चित झाला. हे तिघेही बाद झाल्यावर शार्दुल ठाकूरने अर्धशतक झळकावून दाखवले. त्यामुळे या तिघांपैकी एक फलंदाज जरी अखेरपर्यंत टिकला असता तर सामन्याचे चित्र वेगळे दिसू शकले असते. पाचवी चूक...एक कर्णधार म्हणून लोकेश राहुलकडून काही चुका झाल्या आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसला. भारतीय संघ गोलंदाजी करत असताना त्याने गरज असताना त्यामध्ये बदल केले नाहीत. त्याचबरोबर फलंदाजीला उतरल्यानंतर राहुलला जबाबदारीने मोठी खेळी साकारायला हवी होती, पण तसेही राहुलकडून यावेळी दिसले नाही. राहुलने यावेळी आपण सलामीला येणार, असे ठणकावून सांगितले होते. पण सलामीला आल्यावर मात्र त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FMkfsO
No comments:
Post a Comment