ठाणे : ठाण्यातील पोलीस शाळा प्रशासनाला अचानक जिहाद मिशन २०२२ या मेल द्वारे धमकी देण्यात आली आहे. या मेलमध्ये शाळा, महाविद्यालये आणि रेल्वे स्टेशन देण्यात आली आहे. ही धमकी काल २२ जानेवारी रोजी देण्यात आली आहे. या मेल नंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या मेल मध्ये संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू आहे. मात्र 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची झोप उडाली आहे. ( threatens by email to blow up by ) वाचा- ठाणे पोलीस स्कुलच्या मेलवर जिहाद लष्कर मिशन २०२२ असा मेल आला आहे. या जिहाद तर्फे आलेल्या मेलमध्ये, 'मैं जावेद खान लष्कर २९ का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हूँ.. हमारा एकही मक्सद है, पुरे हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो.. तभी यह देश प्रगती करेगा.. इस लिए हमने दो मार्गो का स्विकार किया है कुर्बानी.. और धमाका.. लष्कर २९ मे कई मुजाहिद सदस्य है, जो हर घर मे जिहाद पहुँचाना चाहते है.. लष्कर २९ जिहाद को मानने वाली हिंदुओ की संघटना है.. धमाका- बिना धमाके के लोगो को समझ नही आती. हिंदुस्थान मे जिहाद पालन करने मे सबसे बडी प्राॅब्लम यहा की एज्युकेशन सिस्टम है.. यहा की एज्युकेशन सिस्टम बंद करके सिर्फ मदरसा द्वारा शिक्षा देनी चाहिए. तभी जिहाद के बारे मे पुरी जानकारी मिलेगी. हम मुंबई के स्कुल और काॅलेज मे धमाके करेंगे.' असा मजकूर लिहिला आहे. वाचा- या मेलमध्ये काही नागरिकांची नावे लिहिण्यात आली आहेत. या संपूर्ण घटनेची माहीती शाळा प्रशासनाने ठाणेनगर पोलीस ठाण्यात केली आहे. ठाणे नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत सायबर कक्षाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rHvtKi
No comments:
Post a Comment