मुंबई: आज देशाला भाजप सरकारच्या धर्मवादी राजकारणातून बाहेर काढायचे असेल, तर देशाला काँग्रेसची आवश्यकता आहे आणि देशात काँग्रेसला मोठं करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले आहे. मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय शिबिरात ते बोलत होते. तर, प्रशिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे, मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून झालेले विचारांचे मंथन येणाऱ्या काळात पक्षाला येणाऱ्या काळात नवी उभारी देण्याचे काम करणार आहे, असा संकल्प मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सोडला आहे. (state chief criticizes ) विचारांचं मंथन आयुष्याच्या शेवटपर्यंत सुरू असेल, तर माणूस कधीही लहान होत नाही. तो मोठाच होत जातो. हेच विचारांचे मंथन मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय शिबिरातून झालेले आहे. आज देशामध्ये केंद्रातील भाजप सरकारकडून धर्माच्या नावाने जातीयवाद करून जनतेमध्ये धर्माच्या नावाखाली भांडणे लावण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, या घाणेरड्या राजकारणातून देशाला बाहेर काढायचे असेल, तर देशाला काँग्रेसची आवश्यकता आहे आणि देशात जर काँग्रेसला मोठं करायचं असेल तर अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे घेणे फार आवश्यक आहे, असे विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केले. वाचा- AICC च्या निर्देशानुसार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, फ्रँटलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकरिता तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादारम्यान 'महाराष्ट्राची सामाजिक चळवळ' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या सत्रामध्ये बोलताना नाना पटोले यांनी हे विधान केले. या प्रसंगी नाना पटोले यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, स्थानिक आमदार हिरामण खोसकर, AICC सचिव सोनल पटेल, AICC चे प्रशिक्षक अमर खानापुरे, पार्थिवराज सिंह काठवडिया, मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर व सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते. वाचा- नाना पटोले पुढे म्हणाले की, आपल्या देशाची ओळख महात्मा गांधी यांच्या विचारांवर टिकून आहे. ही ओळख पुसून टाकण्याचे षडयंत्र केंद्रातील भाजप सरकार व भाजपची नेते मंडळी आज करताना दिसत आहेत. जातीयवाद करून समाजातील लोकांना त्रास देण्याचे काम भाजपचे लोक करत आहेत. या सर्व लोकांना आपल्या सोबत एकत्र आणून जातीयवादी भाजप सरकारच्या जोखडातून बाहेर काढणे आपले काम आहे. या तीन दिवसीय शिबिराच्या शेवटच्या दिवशी मार्गदर्शन करताना भाई जगताप म्हणाले की, प्रशिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. अशा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. आपण कुठे आहोत आणि आपल्याला येणाऱ्या काळात काळात काय करावे लागते याची माहिती मिळते. या शिबिरातून होणारे विचारांचे मंथन येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात नवी उभारी देण्याचे काम करणार आहे. या शिबिरातून आम्ही काय घेऊन जाणार आहोत, ते महत्वाचे आहे. या प्रशिक्षण शिबिराने काँग्रेसच्या प्रत्येक शिलेदाराच्या मनात एक वेगळी भावना व एक स्फूर्तिदायक प्रेरणा द्यायचे काम केले आहे. वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33JWFA3
No comments:
Post a Comment