Breaking

Wednesday, January 26, 2022

करोना: राज्यात आज ३९ हजारांवर रुग्ण झाले बरे; ३५ हजारांवर नवे रुग्ण https://ift.tt/3KL8Hdb

मुंबई: राज्यात आज करोनाचे (Coronavirus) ३५ हजारांवर नवे रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत आज मृत्यूंची संख्या काहीशी घटली आहे. मात्र, कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ३५ हजार ७५६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ३९ हजार ८५७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरत राज्यात आज एकूण २ लाख ९८ हजार ७३३ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. (maharashtra registered 35756 new cases in a day with 39857 patients recovered and 79 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ७१ लाख ६० हजार २९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१५ टक्के झाले आहे. सध्या राज्यात १५ लाख ४७ हजार ६४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार २९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ३१६ इतकी आहे. मुंबईत आज १ हजार ८५८ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज बुधवारी १ हजार ८५८ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या १० लाख ३९ हजार ४४५ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ५६९ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण १ हजार ६५७ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज बुधवारी १ हजार ६५७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात १७२, ठाणे महापालिका क्षेत्रात ३४०, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ७१६, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात २६०, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ५२, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात १७, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात १०० रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज २४५ रुग्ण आढळले असून, वसई विरार मनपा क्षेत्रात २१०, रायगडमध्ये ५३२ आणि पनवेल मनपा क्षेत्रात ३२८ नवे रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा- राज्यात ओमिक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही राज्यात आज ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही. या बरोबर आतापर्यंत राज्यात एकूण २ हजार ८५८ जणांना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी १ हजार ५३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35rwEpK

No comments:

Post a Comment