औरंगाबादः मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री (Amit Deshmukh) यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपाला आता पर्यटन आणि पर्यावरण मंत्री () यांनी उत्तर दिलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच काम चांगलं सुरू असल्याचं म्हणत एका ओळीत अमित देशमुखांच्या आरोपाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. आदित्य ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी शहरातील अनेक विकास कामांचे उद्घाटन केले असून, विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद जिल्हयाची पर्यटन विषयक आढावा बैठक सुद्धा घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला असताना,अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप केल्याचा प्रश्नावर बोलताना म्हणाले की, ठाकरे म्हणाले हे मी पाहिलं नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारच काम चांगलं सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. वाचाः करोनाची आकडेवारी म्हणावी तशी कमी झालेली नाही. १० दिवसांत करोनाचे आकडे कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्ही बैठक घेऊन पर्यटन सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच, औरंगाबादमध्ये डबल डेकोर ईलेक्टरीकल बस सुरू करण्यास चालना देणार, असं आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. वाचाः अमित देशमुख काय म्हणाले होते? सरकारमध्ये असून सुद्धा न्याय मिळत नाही अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही हे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवले. या सर्व कार्यकर्त्यांची भावना असून, कार्यकर्त्यांची भावना दूर करायची असेल तर काँग्रेसचा मंत्री म्हणून आम्हाला अधिक आक्रमकपणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका मांडावी लागेल, असं अमित देशमुख यांनी म्हटलं होतं. वाचाः
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35gAIJe
No comments:
Post a Comment