नवी दिल्ली: भारतीय संघाने सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया दुसऱ्या कसोटीची तयारी करत आहे. ३ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे दुसऱ्या कसोटीला सुरूवात होणार आहे. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने विजय मिळवाल असला तरी काही बाबतीत सुधारणेची गरज आहे. वाचा- भारतीय संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला पहिल्या कसोटीत फक्त १६ धावा करता आल्या. पहिल्या डावात तो फक्त शून्यावर बाद झाला होता. यासंदर्भात बोलताना माजी निवड समिती सदस्य शरनदीप सिंग म्हणाले, टीम इंडियाच्या फलंदाजीचा विभाग सर्वोत्तम कामगिरी करत नाहीय. फक्त केएल राहुल या एका फॅक्टरवर किंवा विराट कोहलीवर अवलंबून राहता येणार नाही. पुजाराला आता धावा कराव्या लागतील. श्रेयस अय्यर संघात संधी मिळण्याची वाट पाहत आहे. पुजारा एक अनुभवी खेळाडू आहे आणि जर तो अशीच खराब कामगिरी करत राहिला तर प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होईल. वाचा- भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली आहे आणि या मालिकेत टीम इंडिया नक्कीच विजय मिळवेल. यजमान संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी कमकूवत आहे. त्यात आता दुसऱ्या कसोटीपासून क्विंटन डी कॉक देखील संघात असणार नाही. या उटल टीम इंडियाच्या गोलंदाजांची कामगिरी शानदार झाली आहे. इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळत असेल तर यावरून लक्षात येते की तो किती चांगली कामगिरी करतोय, असे सिंग म्हणाले. वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eD2z85
No comments:
Post a Comment