Breaking

Thursday, January 27, 2022

दिव्यात शिवसेनेचा भाजपला दणका; भगत कुटुंबीयांनी बांधले शिवबंधन https://ift.tt/3o5OVzd

दिवा: दिव्यामध्ये फक्त शिवसेनेचाच ‘आदेश ‘ अशी फेसबुक पोस्ट यांनी केली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. दिवा शहरातील तो आदेश हा तेव्हापण शिवसेनेत होता आणि आता पण शिवसेनेत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. ( leader joins in diva) येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली ताकद वाढविण्यासाठी पक्षप्रवेश सुरू केले आहेत. शिवसेनेनी कळवा मुंब्रात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रवेश दिल्यानंतर आता दिव्यातील भाजपाला खिंडार पाडले असून भाजपा दिवा शीळ मंडळ अध्यक्ष तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष , अ‍ॅड.सुप्रिया आदेश भगत आणि माजी परिवहन सभापती शैलेश भगत यांनी आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह नेते तथा नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते बांधून व भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे दिवा शहरात शिवसेनेची ताकत वाढली आहे. क्लिक करा आणि वाचा- दिवा गावातील रहिवासी, भूमिपुत्र आणि वकील म्हणून आदेश भगत यांची ओळख आहे. तसेच आदेश भगत हे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत. आदेश यांच्या घरचे मूळचे शिवसैनिक, तर आदेशने सुद्धा सन २००५ पासून २०१४ पर्यंत शिवसेनेत कार्यरत होते. मात्र तेव्हा त्यांचे पक्षात वजन नसल्याने २०१५ साली भाजपमध्ये प्रवेश केला आणि दिवा शहर मंडळअध्यक्ष पद दिले. २०१७ साली त्यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. त्या निवडणूकित सुद्धा त्यांना शिवसेनेची ऑफर होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही आणि मधून निवडणूक लढवली. निवडणूक हरल्यानंतर त्यांनी भाजप काम चालू ठेवले. मात्र राज्यात महाविकास आघाडी येताच पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी वारे वाहू लागले. गेल्या दीड वर्षा पासून आदेश भाजप पक्षाचे काम करताना दिसत नव्हते. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती आणि अखेर आज दुपारी ठाण्यात आदेश भगत यांनी आपल्या पत्नीसह शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, ठाणे महापौर नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते अशोक वैत्ती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी उप-महापौर रमाकांत मढवी उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- ९ जागेसाठी शिवसेना दिला प्रवेश? ठाणे महापालिका प्रभाग वाढले असून दिवा शहरात १ नगरसेवक वाढणार आहे. आता दिव्यात ८ नगरसेवक आहेत आणि ते सर्व शिवसेनेचे आहेत. आता १ नगरसेवक वाढत असल्याने शिवसेनेने तगडा उमेदवार म्हणून आदेश भगत याला पक्षात प्रवेश दिला अशी चर्चा आहे. भाजप पदाधिकाऱ्यामध्ये खुशीचे वातावरण दरम्यान, भाजपला खिंडार पडली असली तरी आदेश शिवसेनेत गेल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यामध्ये खुशीचे वातावरण आहे. आदेश सोबत काही पदाधिकारी यांचे पटत नसे, तशी चर्चा सुद्धा सुरू असे. तर आदेश गेल्याने पक्षाला काहीसा फरक पडणार नाही असे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fZdKbT

No comments:

Post a Comment