Breaking

Monday, January 31, 2022

डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे गर्भवती मातेचा मृत्यू, बालकाचाही गर्भात मृत्यू https://ift.tt/MOuSKBAQi

रवी राऊत/यवतमाळ : डॉक्टराने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे माता व बालकाचा गर्भातच मृत्यु झाल्याची घटना २९ जानेवारीच्या सायंकाळी घडली. अवधुतवाडी पोलीस स्टेशन दिलेल्या तक्रारीवरून मनीष रमेश धोटे रा. शारदा नगर यवतमाळ यांची पत्नी सौ दुर्गा मनीष धोटे (२२) यांचा वर्षाभरापूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ती गर्भवती राहिली. पहील्या महिन्यापासुन दुर्गाला डॉ. अभय बेलसरे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. सुमारे ९ महीने उपचार घेल्यानंतर दोन दिवसांपूर्वी दुर्गाच्या पाठीत दुखत असल्याने तिला उपचारासाठी यांच्याकडे नेण्यात आले. यावेळी दुर्गाची प्रकृती ठणठणीत होती. मात्र एक तास रूग्णालयात बसवून ठेवल्यानंतर डॉ. अभय बेलसरे यांनी तपासणीसाठी आत बोलावले. त्यानंतर त्यांच्या जवळील एक इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर डॉ. बेलसरे यांनी रुग्णांचे नातेवाईक पती मनीष यांना बाहेरुन सोनोग्राफी तसेच रक्त तपासणी करुन आणण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने दुर्गाची सोनोग्राफी तसेच रक्ततपासणी करून आणल्यानंतर डॉ. अभय बेलसरे यांनी दुर्गाला पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलवा, असे सांगितले. एकंदरीत चुकीचा उपचार झाल्यानंतर अतिगंभीर झालेल्या दुर्गा हिला जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागात भरती करण्यात आले. दरम्यान जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र सायंकाळी दुर्गाची प्राणज्योत मालवली. त्यासोबतच ९ महीने पूर्ण झालेल्या बाळाचाही मृत्यू झाला. अवघ्या २२ वर्षाच्या दुर्गाच्या मृत्युने धोटे कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. डॉ. अभय बेलसरे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका गरोदर मातेचा मृत्यू झाला आहे. माता व बाल संरक्षण कायद्यानुसार मातेचा किंवा बालकाचा गर्भातच मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार संबधीत डॉक्टर असून अशा डॉक्टरांचे परवाने रद्द करणे आवश्यक आहे. मात्र यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक बोगस डॉक्टरांच्या हप्तेखोरीने कोणतीही कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे प्रसुतीचे कोणतेही ज्ञान नसताना मोठ मोठे बॅनर बोर्ड लावून गोरगरीब रुग्णांना आकर्षित करण्यात येते. यवतमाळमधील डॉ. अभय बेलसरे यांच्याकडे कोणतेही अत्यावश्यक उपकरणे नसताना रूग्णांवर उपचार करतात. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक तुषार वारे मात्र कोणतीही चौकशी करीत नाही. त्यामुळे खासगी डॉक्टर अभय बेलसरे सारखे दुर्गा सारख्या नवविवाहिताचा बळी घेत आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे तक्रार दिली असून सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबधित डॉक्टर बेलसरे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कारभार संशयास्पद.. माता व बाल संरक्षण कायद्यानुसार ज्या रुग्णालयात सुविधा नाही अशा रूग्णालयातील डॉक्टरला उपचार करण्यास शासनाकडून नामजुंरी दिली आहे. तरीही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मंजुरी मिळवुन संबधित गरोदर मातांवर उपचार केला जातो, अशा डॉक्टराची महिन्यातून एकदा तरी चौकशी करणे गरजेचे असताना असे होत नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे बोगस डॉक्टरांकडून नियमित हप्ता पोहचविला जातो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZVnDChkX2

No comments:

Post a Comment