Breaking

Sunday, January 30, 2022

भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला २५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस https://ift.tt/Yp1w5juc4

औरंगाबाद : नातेवाइकांचा हजारो टन ऊस स्वत:च्या नावे शुगर मिलला घालून काळा पैसा पांढरा करण्याचा, भाजप आमदारावर आरोप करणाऱ्या औरंगाबादच्या एका राष्ट्रवादीच्या नेत्याला चांगलंच महागात पडलंय. कारण राष्ट्रवादीच्या याच नेत्याविरोधात तब्बल 25 कोटी रुपयांच्या ठोकण्याची नोटीस भाजप आमदाराने बजावली आहे. भाजप आमदार यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते. तर असं राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि बंब यांचे कट्टर विरोधक संतोष माने यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तयार करत त्यावरून बंब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एक एकर जमीन नसतानाही प्रशांत बंब यांनी नातेवाईकांचा हजारो टन ऊस स्वत:च्या नावे मुक्तेश्वर शुगर मिलला घालून काळा पैसा पांढरा केला असल्याचा गंभीर आरोप माने यांनी बंब यांच्यावर केले होते. विशेष म्हणजे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत बंब आणि माने एकमेकांच्या विरोधात रिंगणात होते. माने यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देत बंब यांनी, १५ दिवसांत जाहीर माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सोबतच संतोष माने यांच्यावर बंब यांनी २५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बंब यांचा दावा माने यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देतांना बंब म्हणाले की, माझ्याकडे असलेल्या दोन एकर जमिनीतून मिळणारे उसाचे उत्पन्न प्राप्तिकर परताव्यात दाखवले आहे. त्यामुळे स्वत:च्या नावावर इतरांचा हजारो टन ऊस घालण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून, माने यांनी १५ दिवसांत जाहीर माफी मागावी, सोबतच माझ्याबद्दल बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरुन हटवावा. अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा बंब यांनी दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TX1VvPEmD

No comments:

Post a Comment