Breaking

Monday, January 31, 2022

करोनाने कुटुंब उद्ध्वस्त केलं; रागाच्या भरात 'तो' नवग्रह मंदिरात गेला आणि... https://ift.tt/vJ7mDarTu

नवी दिल्ली: दिल्लीतील मंदिर मार्गावर घडलेल्या एका घटनेने सगळेच हादरले आहेत. येथील प्रसिद्ध बिर्ला मंदिरात असलेल्या मंदिरात राहू-केतू मूर्तींची विटंबना करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. ( ) वाचा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. येथे उद्यानात असून त्या मंदिरात एका इसमाने राहू-केतू यांच्या मूर्तींना लक्ष्य केले. ही बाब निदर्शनास येताच तेथील पुजाऱ्याने त्याला रोखले. त्यानंतर संबधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही व्यक्ती ४५ वर्षीय असून त्याचे नाव एकलव्य असल्याचे सांगण्यात आले. तो मूळचा जम्मूतील असून सध्या दिल्लीत वास्तव्याला आहे. तो शासकीय सेवेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याचा तपास केला असता व त्याची अधिक माहिती घेतली असता धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. वाचा : एकलव्यची मानसिक स्थिती बरोबर नाही. तो ड्रिप्रेशनमध्ये गेला आहे. मुळात एकलव्य नियमित पूजा पाठ करणारा आणि धर्मावर आस्था असणारा आहे. मात्र, संकटामुळे त्याच्यावर मोठा आघात झाला. करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. कुटुंबात केवळ तो आणि त्याचे वडील दोघेच बचावले. या आघातामुळे एकलव्यचं मानसिक संतुलन बिघडलं. हे सगळं राहू-केतू, शनी आणि इतर ग्रहांमुळे घडलं असं त्याला सारखं वाटायचं आणि त्यातूनच रागाच्या भरात त्याने मंदिरात तोडफोड केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला अटक करण्यात आली असून वडिलांनी त्याच्या सुटकेसाठी पोलिसांकडे साकडे घातले. घरात आमच्या दोघांशिवाय कुणीच नाही. एकलव्यची मानसिक स्थिती चांगली नसल्याने त्याच्या हातून हे कृत्य घडलं आहे. त्याची सुटका करा अशी विनंती वडिलांनी केली. मात्र, एकलव्यवर गुन्हा दाखल केला असल्याने तुमचे म्हणणे कोर्टात मांडा, असे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8LgHSR3I0

No comments:

Post a Comment