नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. भारतीय संघ ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजबरोबर तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी आज भारताच्या संघांची घोषणा करण्यात आली. रोहितने यावेळी संघाचे नेतृत्व सांभाळल्यावर संघात मोठे बदल केल्याचे पाहायला मिळत आहेत. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांना या संपूर्ण दौऱ्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा या संपूर्ण मालिकेत खेळणार नसल्याचेही आता समोर आले आहे. दुखापतीमुळे तो या संपूर्ण दौऱ्यात खेळणार नाही. लोकेश राहुल हा दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापासून संघाच सहभागी होणार आहे, त्याचबरोबर अक्षर पटेल हा ट्वेन्टी-२० मालिकेसाठी उपलब्ध असेल. यावेळी वनडे आणि ट्वेन्टी-२० या दोन्ही संघांचे उपकर्णधारपद राहुलकडेच सोपवण्यात आले आहे. भारताचा ट्वेन्टी-२० संघ- भारताचा वनडे संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माचा आवडता फिरकीपटू रवी बिश्नोईला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, त्याचबरोबर कुलदीप यादवचे या संघात पुनरागमन होऊ शकते, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले होते. रवी बिश्नोईने आयपीएलमध्ये भेदक गोलंदाजी केली होती. त्याचबरोबर रोहित शर्माने रवी दुसऱ्या संघात असतानाही त्याची स्तुती केली होती. त्यामुळे रोहितने यावेळी त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी दिली आहे. दुसरीकडे कुलदीपच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच तो भारतीय संघापासून लांब होता. पण आता या दुखापतीमधून तो पूर्णपणे सावरलेला आहे. त्यामुळे कुलदीपला आता भारतीय संघात स्थान देण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले होते. आतापर्यंत रोहितने काहीवेळा भारताचे कर्णधारपद भूषवले होते, पण त्यावेळी तो भारताचा हंगामी कर्णधार होता. पण आता रोहित हा भारतीय संघाचा वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार असणार आहे. आगामी वनडे विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून रोहितकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रोहित आता भारतीय संघाचे कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35qZlmJ
No comments:
Post a Comment