Breaking

Wednesday, January 26, 2022

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडून राष्ट्रध्वजाचा अवमान?, अ‍ॅड पाटील यांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार https://ift.tt/3G3f7AR

मुंबई: यांच्या पत्नी आणि दैनिक 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका यांच्या विरोधात अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. (cm uddhav thackerays wife insulted alleges ) प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते. मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, असे अ‍ॅड. पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. क्लिक करा आणि वाचा- प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3o0u4gC

No comments:

Post a Comment