Breaking

Monday, February 28, 2022

नवाबभाई आणि मी उद्घाटनाला एकत्र येणार होतो, पण......, अशोक चव्हाण भाषणादरम्यान भावूक https://ift.tt/3jU5MKv

परभणी : परभणीमधील विकासकामांच्या उद्घाटनाला मी आणि एकत्र येणार होतो. पण आज मला एकट्याला यावं लागलं, याची खंत वाटतेय, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणाले. मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर ते सध्या ईडी कोठडीत आहेत. आज मलिक आणि अशोक चव्हाण यांचा परभणीत नियोजित कार्यक्रम होता. पण मलिकांवरील कारवाईमुळे आज अशोक चव्हाण यांना एकट्याला परभणीत विकासकामांच्या उद्घाटनाला यावं लागलं. अशोक चव्हाण म्हणाले, "मला थोडीशी खंत आहे परभणीतील विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सोबत येणार होतो. याबाबत माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. २७ तारखेला शंकराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे. आपण नांदेडला आणि परभणीला जावू. विकासकामांचा शुभारंभ करु. पण दुर्दैवाने त्यांच्याबाबतीत जे काही सुरु आहे, ते अतिशय खेदजनक आहे. राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. प्रचंड वाईट पद्धतीने भाजप राजकारण करत आहे", अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. केंद्र शासनाने राजकीय विरोधकांबाबत जे काही धोरण स्वीकारले आहे ते उचित नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. केंद्रामध्ये आमचेही सरकार होते. त्या वेळी आम्ही विरोधकांची टीकेला मनमोकळ्या पद्धतीने घ्यायचो. मात्र आता भाजपाकडून सुडाचं राजकारण होत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aVH70cP

No comments:

Post a Comment