म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई सायन येथील एसआरए इमारतीतील घराबाबत वाचा फोडण्यासाठी मंत्रालयात आज एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. रूपा मोरे असे या महिलेचे नाव असून तिने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी तिला तात्काळ अडविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ( by jumping from the third floor of the ) क्लिक करा आणि वाचा- आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रूपा मोरे या मध्यमवयीन महिलेने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिस-या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला रोखले. तिच्यासोबत तिची दोन मुलेही होती. रूपा मोरे यांना नंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fEA57s1
No comments:
Post a Comment