डोंबिवली: एमआयडीसी निवासी विभागातील रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, मात्र काम सुरु झाले नव्हते. त्यासाठी बॅनर लावून मनसेने शिवसेनेला डिवचले होते. आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे () यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी () यांनी काम सुरु होत आहे, आता बॅनर लावले पाहिजेत, असा चिमटा (Raju Patil) यांना काढला. दरम्यान, चांगले काम केले तर बोलायला काय हरकत आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे, हा लोकांचा विजय आहे आणि काम सुरु झाले तर मी अभिनंदनाचा बॅनर लावणार, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. (Conflict between Shiv Sena and MNS over development works in Dombivali) डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांचे काम गेले अनेक वर्षे न झाल्याने या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी ११० कोटींचा निधी मंजूर झाला असून २० वर्षांपासून रखडलेले रस्ते लवकरच नीट होणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले. त्याचे बॅनरदेखील या भागात लागले. या गोष्टीला सहा-सात महिने उलटले, तरी एकाही रस्त्याचे काम अद्याप झाले नसल्याने मनसेने यावरुन शिवसेनेला ट्रोल केले आहे. क्लिक करा आणि वाचा- मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रेयाचे लागलेले बॅनर तिनदा फाटले पण काम झाले नाही असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून लगावल्यानंतर मनसे डोंबिवली शहरच्या वतीनेही एमआयडीसी विभागात बॅनर लावत शिवसेनेला ट्रोल करण्यात आले आहे. कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा असे या बॅनरवरील ठळक विधान सध्या डोंबिवलीकरांचे वेधून घेत होते. यालाच आज उत्तर देत खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना टोला लगावला. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, माध्यमांना प्रतिक्रिया देत राजू पाटील यांनी सांगितले की चांगले काम केले तर बोलायला काय हरकत आहे. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे. हा लोकांचा विजय आहे आणि काम सुरु झाले तर मी अभिनंदनाचा बॅनर लावणार, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- एकनाथ शिंदे यांचा मनसे आमदारांना चिमटा काम होणार आता बॅनर लावला पाहिजे, आम्ही भूमिपूजन केल्यावर माझी सवय आहे, त्याठिकाणी सर्व सामग्री साहित्य सोबत असते. खासदार श्रीकांत शिंदे हे एक पाऊल पुढे आहे. त्यांनी जेसीबी पण आणून ठेवला आहे. आपण लोकांसाठी बांधिल आहोत, यामध्ये राजकारण करायचे नाही, पक्षभेद मतभेद विसरून विकास कामे करायची.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RjyzquK
No comments:
Post a Comment