जळगाव : आणि भाजपमधील संघर्षाने सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री यांनीही सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यांना कुठलाही कामधंदा नाही. उठसूठ माध्यमांसमोर काहीही बोलायचे, एवढंच काम त्यांना आहे. सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत,' अशी टीका करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमय्यांकडून होत असलेल्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. () जळगावात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे महिलांची रॅली निघाली. या रॅलीला झेंडा दाखवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. त्यावेळी गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. किरीट सोमय्या यांना कोणतेही कार्यक्रम नसतात आणि त्यांना कोणी नातेवाईकही नाहीत. फक्त टीका करणं हाच त्यांचा धंदा आहे, असा हल्लाबोलही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आमच्यासाठी वर्षभरातला मोठा सण असतो. मात्र कोर्टाच्या निर्बंधांमुळे ज्या उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी होते त्या आनंदावर आणि उत्साहावर विरजण पडलं आहे. मात्र धोका लक्षात घेता नियम पाळणे ही तेवढंच महत्त्वाचं आहे. शिवजयंती साजरी करत असताना प्रत्येकाने करोनाच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uA5PgOh
No comments:
Post a Comment