नवी दिल्ली: चुरशीची होताना दिसत आहे. यावेळी भाजप आणि यांच्यात मुख्य लढत होत असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. त्यामुळेच यांच्या बसपचं नेमकं काय चाललंय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असून केंद्रीय गृहमंत्री ( ) यांना याअनुषंगाने अत्यंत कळीचा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक उत्तर दिले आहे. शहा यांच्या विधानाचे अनेक अर्थ निघत आहेत. ( ) वाचा : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असून त्यातील तीन टप्पे पार पडले आहे. तीन टप्प्यांतील मतदानानंतर अनेक दावे केले जात असतानाच केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी एक स्फोटक मुलाखत दिली आहे. त्यात उत्तर प्रदेशातील निकाल काय असू शकतील याबाबत शहा यांनी महत्त्वाचे आडाखे बांधले आहेत. वाचा : उत्तर प्रदेशात भाजप बहुमतापासून दूर राहिल्यास मायावती यांच्या बसपाची मदत घेणार का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला असता शहा यांनी त्यावर थेट उत्तर दिले नाही व भाजपच्या आकड्यांचे गणित त्यांनी मांडले. राज्यात दोन पक्षांसोबत आम्ही निवडणूकपूर्व आघाडी केली आहे. या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असून त्याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे शहा म्हणाले. सरकार बनवण्यासाठी आम्हाला कुणाची गरज लागणार नसली तरी सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला निश्चितपणे सर्व विरोधी पक्षांचीही तितकीच साथ लागणार आहे, असेही शहा म्हणाले. २०१४ पासून उत्तर प्रदेशातील जनता एकाच मार्गाने पुढे चालली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजपची साथ दिली आहे. हाच ट्रेंड २०२२मध्येही कायम असून जनतेचा कौल भाजपलाच असेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. वाचा : उत्तर प्रदेशात यावेळी मायावती आणि त्यांच्या पक्षाचे फारसे अस्तित्व जाणवत नाही, याकडे लक्ष वेधले असता अमित शहा यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. मायावती आणि त्यांच्या पक्षाबाबत असे आडाखे बांधणे चुकीचे ठरेल. त्या तळागाळात पोहचलेल्या आहेत. आहे शिवाय या निवडणुकीत मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणात मायावती यांच्या बाजूने झुकेल, असे शहा म्हणाले. मायावती यांची व्होटबँक असली तरी त्यातून त्यांना किती जागा मिळू शकतील, याचा अंदाज आताच बांधता येणार नाही, असेही शहा यांनी पुढे नमूद केले. शहा यांनी न्यूज १८ या वृत्तवाहिनीला ही मुलाखत दिली आहे. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/f1XsvlS
No comments:
Post a Comment