Breaking

Friday, February 18, 2022

ठाणे-दिवा मार्गिकेचे उद्घाटन; नाही नाही म्हणता शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद रंगलाच https://ift.tt/JYa3cld

दिवा: पाचव्या सहाव्या मार्गिकेवरून नाही नाही म्हणता शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयवाद रंगलाच. सकाळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या कामाचे श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच असून याचे श्रेय दुसरे कोणीही घेऊ नये असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सायंकाळी दिवा रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दानवे यांना प्रत्युत्तर देत कामाचा पाठपुरावा हा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीच केला असून प्रत्यक्ष कामाच्यावेळीही ते हजर उपस्थित होते. आता श्रेय घेण्यासाठी आलेल्यांपैकी तेव्हा कोणीही उपस्थित नव्हते असा टोला भाजपला लगावला. ( between and seen after inauguration of ) नाही नाही म्हणता पाचव्या सहाव्या मार्गिकेचा श्रेयवाद हा दिव्यात रंगलाच. सर्वात प्रथम दिवा स्टेशन परिसरात दोन्ही पक्षांनी आपले बॅनर लावत एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्यातच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी ठाणे ते दिवा लोकल प्रवास करीत दिवा स्थानकात उपस्थित झाले. या दरम्यान, याचे श्रेय कोणी घेऊ नये हे श्रेय आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते असे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. तर भाजपकडून मंत्र्यांचे ढोलताशा वाजवत स्वागत करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- संध्याकाळी चारच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकातून लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे आठही नगरसेवक आणि कार्यकर्ते दिवा स्थानकात जमले. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे आणि कार्यकर्ते जमले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना श्रेय जाऊ नये म्हणून आपापल्या नेत्यांच्या जोरदार घोषणाबाजी केल्या. आणि जल्लोष सुद्धा केला. घोषणाबाजीमुळे रेल्वे स्थानकातील वातावरण चांगलेच तापले. क्लिक करा आणि वाचा- यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी प्रतिक्रिया देत रावसाहेब दानवे यांना टोला लगावला. मढवी यांनी सांगितले की, देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे श्रेय पंतप्रधान याना असते. मात्र २०१४ ते २०२१ या काळात खासदार शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. आज उद्घाटनाला केंद्रीय मंत्री बाजूच्या मतदार संघातील खासदार, आमदार ते आज येथे आले असतील. मात्र प्रत्यक्षात दिवेकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून खासदार शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले. काम सुरु असताना देखील मेगाब्लॉक दरम्यान खासदार कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बसेसची सोय देखील करण्यात आली होती. प्रत्यक्ष कामाच्यावेळी खासदार सोडून दुसरे कोणीही दिसले नाहीत. ते आज दिसले. दिवेकर हे सगळं जाणतात असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणूकीमध्ये दिव्यात शिवसेना विरुद्ध भाजप हे चित्र पुन्हा दिसू शकते. क्लिक करा आणि वाचा- करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन सायंकाळी सेना भाजपाचे कार्यकर्ते जमल्याने दिवा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. विशेष म्हणजे कोणीही कोरोनाचे नियम पाळताना दिसत नव्हते. अनेकांनी मास्कही परिधान केले नव्हते. एरवी रेल्वे प्रशासन प्रवाशांना मास्क वापरण्याविषयी सक्ती करत असताना दुसरीकडे अशा राजकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जाते का असा सवाल उपस्थित होत आहे. भाजप कार्यकर्त्यांचा रेल्वे रुळांवर सुद्धा जल्लोष रेल्वे स्थानकात ढोल ताशा वाजवत, त्याच्या गजरावर ठेका धरत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना त्यांनी चक्क रेल्वे रुळ ओलांडत नियमांचे उल्लंघन करत जल्लोष केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Pq1w6LO

No comments:

Post a Comment