Breaking

Saturday, February 19, 2022

"पुष्पाला सांगा, डॉन आलाय" म्हणणाऱ्या शिवसेना नेत्याला संदीप क्षीरसागर यांचं प्रत्युत्तर, म्हणाले.... https://ift.tt/PVChxvF

बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार () आणि त्यांचे सख्खे चुलत बंधू शिवसेना नेते यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगलीय. आ. संदीप क्षीरसागर यांनी एका भाषणात पुष्पा चित्रपटातील "मैं झुकेगा नही" हा डायलॉग म्हणत विरोधकांना इशारा दिला. यानंतर आता आमदार संदीप यांचेच सख्खे चुलतभाऊ शिवसेना नेते योगेश क्षीरसागर () यांनी 'मैं हूँ डॉन' हे गाणे गाऊन त्यांना डिवचले आहे. आता पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर पलटवार केला आहे. मी पवारसाहेबांचा शिष्य आहे, फक्त बोलणार नाही तर करुन दाखवतो, असं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर पलटवार केला आहे. एरवी काका- पुतणे यांचा वाद जगजाहीर असताना आता सख्खे चुलतभाऊ आमनेसामने आल्याने बीडचे राजकारण तापले आहे. दोन चुलत बंधूंमधली एकमेकांना डिवचण्याची जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना पाहायला मिळतीय. दोन्ही बंधू आपापल्या भाषणांमधून, सार्वजनिक कार्यक्रमांमधून एकमेकांवर टोलेबाजी करताना दिसून येत आहेत. आमदार संदीप क्षीरसागर काय म्हणाले? मैं हूँ डॉन म्हणणाऱ्या चुलत भावाला आ. संदीप क्षीरसागर यांनी त्यांनी मोठ्या शिताफीने उत्तर दिलं. मी पवार साहेबांचा शिष्य आहे. त्यामुळे काही बोलणार नाही मात्र मी माझ्या कामातून करून दाखवेन, असं ते म्हणाले. बीड शहरात तीन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात संदीप क्षीरसागर सहभागी झाले होते. आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः ढोल-ताशांच्या चालीवर ठेका धरत भगवा ध्वज नाचवला. दोन भावांच्या जुगलबंदीत एमआयएमची उडी क्षीरसागर चुलत भावांच्या आरोप-प्रत्यारोपात आता एमआयएमने उडी घेतली आहे. पुष्पाला जंगलात पाठवू आणि डॉनला हद्दपार करु, बीडमध्ये जंगलराज आहे का? असा संतप्त सवाल एमआयएम जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांनी उपस्थित केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dRBL5Ss

No comments:

Post a Comment