मॉस्को : युक्रेनच्या पूर्वेकडील आणि या दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचे रशियाचे अध्यक्ष ( ) यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे स्पष्ट झाले आहेत. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री उशिरा देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पुतीन यांनी युक्रेनवर रशियाचा ऐतिहासिक अधिकार असल्याचे सांगितले. दरम्यान, जवळपास एक तास पुतिन यांनी देशाला उद्देशून भाषण केले. त्यानंतर युक्रेनमधील बंडखोर नेत्यांसोबत मैत्री आणि मदत याबाबतच्या करारावरही त्यांनी स्वाक्षरी केली. ( ) वाचा : युक्रेनमधील बंडखोर प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याबाबतच्या आदेशावर पुतीन स्वाक्षरी करणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्त्झ यांनी रशियाच्या या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. रशियाने युक्रेनमधील बंडखोर भागाला वेगळा देश घोषित केल्यास युरोपीय महासंघ रशियावर निर्बंध लादेल, असा इशाराही या देशांनी दिला आहे. पुतिन यांनी दोन्ही नेत्यांना फोनवरून आपल्या निर्णयाची माहिती दिली. ‘खरेखुरे असाम्यवादीकरण काय असते, ते दाखवून देण्यास तयार आहोत,’ अशी वल्गनाही पुतिन यांनी यावेळी केली. वाचा : दरम्यान, युक्रेनच्या सार्वभौमत्वाला धक्का देणाऱ्या रशियाच्या एकतर्फी निर्णयावरून संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली असून थेट शब्दांत इशाराही दिला आहे. तर, या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात यावी, अशी विनंती युक्रेनकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे रशिया-युक्रेन सीमेवर तणाव वाढत चालला आहे. गोळीबारात एक युक्रेनी नागरिक ठार झाल्याने तणावात अधिकच भर पडली आहे. त्याचवेळी रशिया आज युक्रेनवर हल्ला करू शकतं, अशी भीती पेंटागॉनकडून व्यक्त करण्यात आली आहे. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GKYlSk8
No comments:
Post a Comment